Ad will apear here
Next
रत्नागिरीतील आर्ट सर्कल संगीत महोत्सवातील कलाकारांच्या भावमुद्रा
२४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या प्रांगणात तेरावा आर्ट सर्कल संगीत महोत्सव पार पडला. त्यात विविध नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली. रत्नागिरीतील लेन्सआर्ट या फोटोग्राफर्सच्या ग्रुपमधील सदस्यांनी या कलाकारांच्या टिपलेल्या भावमुद्रा येथे प्रसिद्ध करत आहोत. उपेंद्र बापट, विवेक सोहनी, वल्लभ नाटेकर आणि सिद्धेश वैद्य या फोटोग्राफर्सनी या भावमुद्रा टिपल्या आहेत. (या महोत्सवाचे सविस्तर वार्तांकन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पहिल्या दिवशी डॉ. कनीनिका निनावे आणि पूजा भालेराव यांचे भरतनाट्यम नृत्यकीर्तन झाले. या नृत्यकीर्तनामध्ये सरस्वती सुब्रह्मण्यम यांनी गायनसाथ, अतुल शर्मांनी बासरीसाथ, तर सतीश कृष्णमूर्तींनी मृदंगसाथ केली. 








नृत्यकीर्तनानंतर विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांची मैफल झाली. अजय जोगळेकर यांनी त्यांना संवादिनीची, तर मंगेश मुळ्ये यांनी तबल्याची साथ केली.





दुसऱ्या दिवशी मुग्धा वैशम्पायनचे शास्त्रीय गायन झाले.  अनंत जोशी यांनी मुग्धाला संवादिनीची, तर स्वप्नील भिसे यांनी तबल्याची साथ केली.






त्यानंतर संतूरवादक संदीप चॅटर्जी आणि बासरीवादक संतोष संत यांची जुगलबंदी रंगली. तिला तबलावादक पं. रामदास पळसुले यांची साथ लाभली.



तिसऱ्या दिवशी (२६ जानेवारी) स्त्री ताल तरंग हा कार्यक्रम झाला. पहिल्या स्त्री घटमवादक सुकन्या रामगोपाल यांच्यासह सौम्या रामचंद्रन (व्हायोलिन), लक्ष्मी पिल्लई (मृदंग), वाय. जी. श्रीलता (वीणा) आणि भाग्यलक्ष्मी (मोर्चिंग) यांनी ही मैफल रंगवली.





पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता झाली. त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्याची, तर कृष्णा मुखेडकर यांनी संवादिनीची साथ केली. 










 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZJICI
Similar Posts
सूर-तालांच्या बहारदार आविष्काराने रंगला ‘आर्ट सर्कल’ संगीत महोत्सव रत्नागिरी : इतिहासाच्या आठवणी सांगणाऱ्या आणि कलेचा समृद्ध वारसा असलेल्या भव्य थिबा राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ख्यातकीर्त कलाकारांनी सूर-तालांचा बहारदार आविष्कार सादर केला आणि तीन संध्याकाळी रसिक रत्नागिरीकर एका वेगळ्याच विश्वात रमून गेले. २४ जानेवारीला डॉ. कनीनिका निनावे आणि पूजा भालेराव
‘आर्ट सर्कल’चा कला संगीत महोत्सव २४ जानेवारीपासून; थिबा राजवाडा प्रांगणात ख्यातकीर्त कलाकारांचे सादरीकरण रत्नागिरी : केवळ रत्नागिरीचेच नव्हे, तर कोकणचे नाव सांस्कृतिक विश्वात देशभरात पोहोचवणारा, ‘आर्ट सर्कल’तर्फे आयोजित केला जाणारा कला संगीत महोत्सव २४, २५ आणि २६ जानेवारी २०२० रोजी ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात होणार आहे. दर वर्षीप्रमाणेच प्रतिभावान आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार यात आपली कला सादर करणार आहेत
पुलोत्सव तरुणाई पुरस्कार अनघा मोडक यांना; सामाजिक कृतज्ञता सन्मान ‘सुहित जीवन ट्रस्ट’ला रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांतर्फे रत्नागिरीत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुलोत्सवा’तील यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अचानकपणे दृष्टी गमावल्यानंतरही खचून न जाता संघर्षमय प्रवास करून निवेदक म्हणून प्रभावी कामगिरी करणाऱ्या अनघा मोडक यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्कार जाहीर झाला आहे
रत्नागिरीच्या ‘पुलोत्सवा’त बहुरंगी कार्यक्रमांची मेजवानी; आठ ते १० नोव्हेंबरदरम्यान आयोजन रत्नागिरी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यंदाही रत्नागिरीत ‘पुलोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आठ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत त्याचे आयोजन करण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language